प्रिय गुरुजी,
सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात,
नसतात सगळीच सत्यनिष्ठ,
हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी.
मात्र त्याला हे देखील शिकवा,
जगात प्रत्येक बदमाशागणिक
असतो एक साधूचरित , पुरुषोत्तमही
स्वार्थी राजकारणी असतात जगात,
तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही.
असतात टपलेले वैरी , तसे जपणारे मित्रही,
मला माहित आहे !
सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत.........
तरीही जमलं तर त्यांच्या मनावर ठसवा,
घाम गाळून कमावलेला एकच छदाम,
आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे.
हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा
आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला ,
तुमच्यात शक्ती असती तर .........
त्याला द्वेष मत्सरापासून दूर रहायला शिकवा
आणि शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला.
गुंडांना भीत जावू नको म्हणावं,
त्यांना नमविणे सर्वात सोपं असतं.
जमेल तेवढं दाखवित चला त्याला ,
ग्रंथ भांडाराच अदभूत वैभव.
मात्र त्याबरोबरच ,
मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा,
सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला ,
पाहू दे त्याला , पक्षांची अस्मान भरारी ............
सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर ..........
आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं......
शाळेत त्याला हा धडा मिळू दे ,
फसवून मिळालेल्या यशापेक्षा ,
सरळ आलेल अपयश श्रेयस्कर आहे .
आपल्या कल्पना, आपले विचार ,
यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने ,
बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी ,
त्याला सांगा ................
भल्याशी भलायीन वागावं,
आणि टग्यांना अद्दल घडवावी .
माझ्या मुलाला हे पटवता आल तर पहा .........
जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत,
सामील न होण्याची ताकद त्यान कमवायला हवी ,
पुढे हेही सांगा त्याला ,
ऐकावं जनाच अगदी सर्वांच ...........
पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून ,
आणि फोलपट टाकून निव्वळ सत्व तेवढं स्वीकाराव.
जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा,
हसत रहावं उरातल दुख्ख दाबून ,
आणि म्हणावं त्याला
आसवांची लाज वाटू देऊ नको.
त्याला शिकवा .........
तुच्छतावाद्याना तुच्छ मानायला ,
अन चाटुगिरीपासून सावध रहायला .
अन चाटुगिरीपासून सावध रहायला .
त्याला हे पुरेपूर समजवा की ,
करावी कमाल कमाई त्याने, ताकद आणि अक्कल विकून,
पण कधीही विक्रय करू नये, हृदयाचा आणि आत्म्याचा.
धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर,
कानाडोळा करायला शिकवा त्याला.
आणि ठसवा त्याच्या मनावर,
जे सत्य आणि न्याय वाटते,
त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.
त्याला ममतेन वागवा,
पण, लाडावून ठेवू नका.
आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
लोखंडाच कणखर पोलाद होत नसतं,
त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य,
अन धरला पाहिजे धीर त्याने,
जर गाजवायच असेल शौर्य .
आणखीही एक सांगत रहा त्याला ..........
आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर,
तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर,
माफ करा गुरुजी,
मी फार बोललो आहे _
खूप काही मागतो आहे.........
पण पहा........
जमेल तेवढ अवश्य कराच,
माझा मुलगा, भलताच गोड छोकरा आहे हो तो.
अब्राहम लिंकन
boaring letter aahe hooooooooooooo
उत्तर द्याहटवाTula akkal aahe ka?
हटवाखूप सुंदर पत्र आहे.वडीलाला मुलाची किती काळजी असते हे पत्रात मांडले आहे.
हटवाशाळेत असताना फक्त पुस्तकी ज्ञान नको तर त्या समाजाचं सुद्धा ज्ञान मिळू दे.
त्याला लाडावून ठेवू नका कारण त्या लाडामुळे तो आपलं कर्तव्य विसरून जाईल.पण त्याला समजून सांगा कारण माझा मुलगा खूप गोड आहे तो नक्की समजेल.
Tula hyach meaning samajat nahi mhanun boaring vatat ahe. Hyatala ek ek word cha arth samjun ghe... Ajchya kalat pratyek palakala ani pratyek mula/mulina garaj ahe he samjaychi.
हटवात्यांचं उत्तर काय होतं सांगू शकाल का???
हटवाजगतील सर्वोत्तम पत्र...
हटवापालक बालक आणि शिक्षक यांचा सर्वदूर विचारपूर्वक मांडलेले पत्र, माझ्याकडे आठवी पासून BDS पूर्ण होईपर्यंत preserve केलं होतं
हटवाHe fakta vachu naka tar samjhun ghya, aplya parateka la he samjhayala hav ki apan sudha aplya madhe badal karun ghetla pahije karan aaplya school time madhe aaplyala te she kaval nahi pan te pratek school madhe asat pan tya tarene koni hyatali konti gosht shikvali nahi.
उत्तर द्याहटवाekdam barobar aaj che shishak fakt payment ghenysathi school madhe yetat patyata vajhatat zale tyanche .....hadache shishak nahi aahe mothi shokantika aahe ya deshachi...
हटवाmala wela nahi.karan porshan purn karawaycha ahe.abraham sir patra .mala mahit nahi karan.me 21shatakatala studant ahe.mala nokari tikavayachi ahe.100 mulana 90% mark kase milatil ya kaljit me ahe.he jar me mulana sangat basalo tar mala nerrow minded samjun palk martil ani nokari jail.LINKAN SIR APNAS SALAM.SALAM TUMACHYA DNANALA.SALAM TUMACHYA DHIRALA.MALA PAMARALA MAF KARA.
हटवाPatra vachal , mast ahe. Double graduate Houn sudha itkya kami mandhanavar kam fkt shikshak karu shakto. Karan to swatachya nokari la nokari nhi manat kartavya Manto.deshat doctor, engineer ani udyogpati ghadvnara Shikshakach ahe.Lincon sir aaj parynt tumchya sarkha palak nahi bhetlana.
हटवाMi Ya purvi asa kahi vachla hi nahi va aikla hi nahi, kharach abrahim cha mulga ghadala ki nahi tasa dev jane parantu Pratek pityane aplya palya baddal ashich uttung dheya ani laksh asu dyava, he patra na vachalelya lokana vachaila pravruta karav.
हटवाMazi Ashi apeksha aahe ki sarvanich abrahmn Linkon cha headmasterans lihilee Patra vachava ya patramadhye khupach change changle morals aahet tyanni ya ptrat aatach pithi Kashi asayla having he sangitla aahe
हटवाMy lifes inspires 👌👌👌👌👌❤❤💬💬👏👏👏👏👏👏👏👏
हटवाjust don't read please understand what is the story behind.
उत्तर द्याहटवाSundar vichar aahet.......
उत्तर द्याहटवाHe patra sarva shalanmadhe frame karun lava
हटवाyes this is righr
उत्तर द्याहटवाpratyek shixkane ek palak mhanun ani pratyek palakane ek shixak mhnun vichar karun hya patrapramane aaplya palyala ghadwaycha prayatn karayla hawa,tar tyanch jiwan safal zal as m manen..jyamule te ek navin fulnarya jiwanala yogy disha detil
उत्तर द्याहटवाthise is letter of success
उत्तर द्याहटवाfirst type the correct spelling of this/these..........
हटवाEach one read it must esp parents
उत्तर द्याहटवाshikshakachya honjlit nirman ani bhavishya he doni goshti asatat.
उत्तर द्याहटवाjarur vacha
उत्तर द्याहटवाya patra mule aapn khup kahi shiku shakto
उत्तर द्याहटवाthis is follow my son,he is 4 year old .i requist his teacher please teach my son.same letter word .
उत्तर द्याहटवाThax for letter in marathi
उत्तर द्याहटवाTranslate by Marathi great writer Vasant Bapat
हटवाशिक्षका पेक्षा वडिलांची भुमिका महत्वाची
हटवाthis is follow my son,he is 4 year old .i requist his teacher please teach my son.same letter word .
उत्तर द्याहटवाcharitra vachalyanech swatachi charitra ghadate.tysati frist apan badali pahiji.apale.vichar badali pahliji .apale panyasarkhe niramal asali pahiji.pratna madhe yash asate.fkt tyala kahi time galavava lagto. all the best your life.
उत्तर द्याहटवाThis is so true but we have no change your life there for this letter is only one letter so you have change the life at this letter thanks
उत्तर द्याहटवाha patra prakashit karun tumbhi manavtecha dharma purna kela .
उत्तर द्याहटवाkhup khup khup ................................................DHANYAVAD.
ये ख़त अगर पूरी ध्यान से पढोंगे तो ओ आपके दिल पर अपनी छाप छोड़ जायेगा
उत्तर द्याहटवाहे पत्र कोणा एकासाठी नसून समाजाच्या हितासाठी उन्नतीसाठी निडर निर्भिड संयमी सत्शील सदाचरणी सुशील निसर्गप्रेमी व जेष्ठांचा व श्रेष्ठांचा आदर करणारा आदर्श समाज घडवण्याचा घालून दिलेला आराखडा आहे. हे कठीण आहे. पण असाध्य मुळीच नाही.
उत्तर द्याहटवाThis very good letter first understand the letter and try to implement in our society
उत्तर द्याहटवाManan v Chintan karnyayogya Patra
उत्तर द्याहटवाeach word of this letter is tigress milk
उत्तर द्याहटवाKhup Khup Sundar
उत्तर द्याहटवाvery very nice
उत्तर द्याहटवाkhup changale vichar aahet
उत्तर द्याहटवापत्र अगदी बरोबर आहे !!!!!!!
उत्तर द्याहटवाkadak patr aahe
उत्तर द्याहटवाPratekane ya patrapramane waagava asa patra ahe. Marathit kelela anuwaad chan jamala ahe.
उत्तर द्याहटवाSuper words
उत्तर द्याहटवाkhup khup mast aahe
उत्तर द्याहटवामाझ्या शाळेत (कमला निंबकर बालभवन) हे पत्र फ्रेम करून लावले आहे.हे पत्र आम्ही रोज वाचायचो . शिक्षकही असेच चांगले होते. या पत्राचा मनावर खूप सखोल आणि चांगला परिणाम झाला. आता पुढच्या पिढीला हे पत्र समजावे हीच अपेक्षा. खूप वर्षांनी पुन्हा वाचायला मिळाले. ज्यांनी पोस्ट केले त्यांना आभार.
उत्तर द्याहटवाखूप छान मस्त आहे पञ प्रत्येक शब्द खरा आहे आणि आयुष्य त्या प्रमाणे जगणे खूप अवघड आहे पण अशक्य नाही. आपणसुद्धा त्या प्रमाणे जगले पाहिजे प्रयत्न तरी केले पाहिजे जो कोणी व्यक्ती पञा प्रमाणे वागल त्याचखरंच कल्याण सोन होईल.....
उत्तर द्याहटवाIt's a good letter📩, but it's not❌ for read . Writing📝 words are for come our life and become a beautiful life
उत्तर द्याहटवाMi lahan astana he patra mazya Vadilani gharat aanun lavale ani roj te swataha amhala vachun dakhavat asat ani mazyakadun vachun ghet asat. Hya patratala ek ek shabd manavar korala gela ahe mazya. Hya letter madhil shabdansarkhach mazya vadilani mala ghadavalel ahe.
उत्तर द्याहटवाToday i am going to make a wall banner of this letter for that sweet memories with my Pappa. Thank you so much to this Blogger for post this letter here.
Good letter for motivation to all father.
उत्तर द्याहटवाInsperational letter
उत्तर द्याहटवाTnx fir letter in marathi
उत्तर द्याहटवाThanks for marathi translated letter
उत्तर द्याहटवाIt's great
उत्तर द्याहटवाखूपच छान आहे हे पत्र मुलांना माणूस आहेस आणि माणूस बनूनच राहा हे शिकवण्याठी पैसा काय भिकारी पण कमावतो
उत्तर द्याहटवाKhup sundar
उत्तर द्याहटवाहे खूप छान motivation पर पत्र आहे मला वाटत सर्वांनी या गोष्टी आपल्या मुलांना शिकवाव्या व समजून सांगाव्या
उत्तर द्याहटवाawesome..............
उत्तर द्याहटवाहे फक्त एक पत्र नाही तर एक संस्कार आहे येनार्या पिढीसाठी
उत्तर द्याहटवा.
वैभव रमेश खोत: खुप छान सुंदर विचारधारा आहे प्रत्येक पालकाची अशीच अपेक्षा असणे आवश्यक आहे तरच एक चांगला नागरिक निर्माण होईल, जो स्वताच्या आधी या देशाचा विचार करेल आणि आदर्श निस्वारथी माणुस म्हणुन जिवन जगेल,
उत्तर द्याहटवाया पत्रा मध्ये वडील आपल्या मुलाची भविष्य विषयी चिंता व्यक्त करताना दिसत आहेत आणि या जगामध्ये जगताना कस जगाव आणि कस वागाव हे खुप महत्वाचा संदेश दिला आहे कोणतेही वडील आपल्या मुलांविषयी किती दुर चा विचार करतात हे या पत्रा मध्ये दिसत आहे. .खूप छान पत्र वाचून मला माझ्या वडिलांची आठवण झाली ..सर्व साठी एक सुंदर आसा संदेश
उत्तर द्याहटवा